लाडक्या बहिणींनो KYC करून देखील पैसे नाही! त्यांनी हे काम करा मिळतील 1500 रुपये

राज्यात सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही आज अनेक महिलांसाठी आधार बनलेली योजना आहे. या योजनेमुळे घरखर्च, औषधोपचार, मुलांचे शिक्षण अशा छोट्या-मोठ्या गरजांसाठी महिलांना दरमहा थोडी आर्थिक मदत मिळते. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये थेट जमा केले जातात.

ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी असून, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. सुरुवातीला मोठ्या संख्येने महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आणि अनेकांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवातही झाली. मात्र आता 2026 मध्ये सरकारकडून e-KYC बाबत नवीन कडक नियम लागू करण्यात आले आहेत.

सरकारने स्पष्ट सांगितले आहे की, ज्या महिलांची e-KYC पूर्ण नाही, त्यांच्या खात्यात पुढील हप्ते जमा होणार नाहीत. कारण काही ठिकाणी चुकीची माहिती, डुप्लिकेट अर्ज आणि अपात्र लोकांकडून लाभ घेण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे खरी गरजू महिला लाभापासून वंचित राहू नये, यासाठी e-KYC अनिवार्य करण्यात आली आहे.

पूर्वी e-KYC साठी दिलेली अंतिम तारीख काही महिलांना माहीत नव्हती किंवा तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया पूर्ण झाली नाही. हे लक्षात घेऊन सरकारने अंतिम मुदत वाढवली, तरीही अजूनही अनेक महिलांची KYC अपूर्ण आहे. अशा महिलांनी वेळीच आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खात्याची माहिती तपासून घ्यावी.

KYC करून देखील काही ना पैसे आले नाहीत त्यांना सांगायचे आहे की त्यांनी केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडल्यामुळे त्यांचे अर्ज पेंडिंग मध्ये पडलेले असतील त्यामुळे त्यांचे अर्ज दुरुस्त करण्याची गरज आहे त्यामुळे जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे संपर्क साधा. तुमच्या अर्जामध्ये जी त्रुटी आहे ती पुन्हा आपण जळणी केली जाईल आणि लवकरच तुमचे पैसे चालू होतील.

योजनेची लाभार्थी यादी ही गाव, वॉर्ड, नगरपालिका किंवा जिल्हा पातळीवर तयार केली जाते. काही ठिकाणी महिलांचे नाव यादीत असते, पण e-KYC पूर्ण नसल्यामुळे पैसे खात्यात येत नाहीत. त्यामुळे फक्त नाव लिस्टमध्ये आहे म्हणजे पैसे येतील, असे समजणे चुकीचे आहे.

अलीकडे काही जिल्ह्यांमध्ये महिलांनी तक्रारी केल्या आहेत की मागील महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाही. यामागे मुख्य कारण म्हणजे KYC अपूर्ण, बँक खाते आधारशी लिंक नसणे किंवा डेटा अपडेट न होणे. अशा वेळी महिलांनी अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, किंवा जवळच्या सेवा केंद्राशी संपर्क साधणे गरजेचे आहे.

या योजनेचे पैसे अनेक महिलांसाठी फार महत्त्वाचे आहेत. काही महिलांसाठी हे पैसे औषधासाठी, तर काहींसाठी घरखर्च भागवण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे पैसे वेळेवर न आल्यास साहजिकच चिंता वाढते. सरकारकडून योजना बंद केली जात नाहीये, मात्र नियम पाळणे आता खूप आवश्यक झाले आहे.

जर तुम्ही या योजनेच्या लाभार्थी असाल, तर आजच तुमची e-KYC पूर्ण झाली आहे का ते तपासा. मोबाईल नंबर बदललेला असेल, बँक खाते बंद झाले असेल, किंवा आधार लिंक नसेल तर ते लगेच दुरुस्त करा. कारण पुढील हप्ते मिळवण्यासाठी हे सगळे महत्त्वाचे आहे.

एकंदरीत पाहता, लाडकी बहिण योजना अजूनही सुरू आहे, पण आता थोडी काळजी घेणे आणि कागदपत्रे अपडेट ठेवणे महिलांसाठी गरजेचे झाले आहे. योग्य माहिती आणि वेळेत केलेली e-KYC तुम्हाला दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळवून देऊ शकते.

Leave a Comment